Tuesday, February 12, 2013

भाकरीतच शोधला तिनं जगण्याचा चंद्र
धोंडिराम पाटील - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 06, 2013 AT 03:00 AM (IST)
सांगली - बाई भाकरी थापते, यात विशेष काहीच नाही. पण एखादी बाई केवळ भाकरी थापून देण्याचं काम करते आणि या कामाच्या जीवावर आपला संसार गाडा हाकते. नव्हे तर शून्याचं विश्‍व बनवते हे विशेष. ही विशेष माऊली म्हणजे सुनीता अशोक शिवापुरे. पती आणि दोन लेकरांच्या मदतीने तिने भाकरी देण्याच्या कलेला व्यवसाय बनवला आहे. रोज 7-8 तास ही माऊली भाकरी थापण्याचे काम तेही चुलीवर करते. गेल्या सात वर्षांपासून रोज सरासरी 750 ते 800 भाकरी थापून ती हॉटेलना पुरविते. त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर ती संसारगाडा चालवित आहे.

सुनीता व पती अशोक, मुले गजानंद व अजित असं चौकोनी कुटुंब. मूळ गाव घटप्रभा (ता. गोकाक, जि. बेळगाव). एकरभर जमीन, पण तीही कोरडवाहू. त्यामुळे हंगामी पिके घेत असत. पोट भरेना म्हणून अशोक बारा वर्षांपूर्वी सांगलीत आले. इमारत कामावर वॉचमन म्हणून राबू लागले. पत्नी व मुलांनाही आणले. वॉचमनकीवर जमेना. कसंतरी पोट भरे. मुलांचं शिक्षण, कायमचा निवारा हे प्रश्‍न होतेच. हॉटेलचालकांकडे भाकरी थापण्याचं, चपाती लाटण्याचे काम मिळाल्याने सुनीता यांनी संसारात मदत झाली. रोज हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच भाकरी, चपाती करून हॉटेल चालकांना पुरवण्याचा विचार त्यांनी केला. काम सुरू झालं. सुरवातीला 100 भाकरी करून देत. आता ही संख्या 750-800 वर गेली आहे. पिठाची चांगली मळणी, चांगली भाजणी यामुळे मागणीही चांगली आहे. सांगली व जयसिंगपूरचे हॉटेलचालक त्यांचीच भाकरी घेतात. पावसाळ्यात काही कालावधी सोडला तर भाकरी थापण्याचे काम सतत सुरू आहे. याच कामाच्या जोरावर त्यांनी सव्वागुंठा जमीन घेऊन हक्काचा निवारा उभारला. गजानंद 7 वी, तर अजित 6 वी मध्ये अभिनव प्राथमिक शाळेत शिकतात. 

सौ. सुनीता म्हणाल्या, 'चुलीवर भाकरी थापून, भाजून देण्याचं काम कष्टाचंच आहे. सलग सात आठ तास काम करावं लागतं. मी भाकरी करून देते. मुलं व पती ती पोहोचवतात. भाकरीने मला भाकरी तर दिलीच. हक्काचा निवारा झाला. मुलाच्या शिक्षणासाठी मदत झाली. सात वर्षांपासून काम करीत आहे. हॉटेलमध्ये सतत मागणी असल्याने सुटी घेता येत नाही. पिठाच्या चांगल्या मळणीमुळे भाकरी फाटत नाही. चुलीमुळे भाजणी चांगली होते. मजूर मिळत नसल्याने साऱ्या कुटुंबाला राबावं लागतं.''

त्या म्हणाल्या, 'पोरांची साथ, पतीची मदत यामुळं कष्टाचं काहीच वाटत नाही. पोरांनी शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं, कष्टाचं चीज करावं, एवढीच अपेक्षा आहे.''

कागदासारखी पातळ, चंद्रासारखी गोल शिवापुरे यांच्याकडे तयार होणारी भाकरी ज्वारीचीच, पण चार पाच दिवस टिकणारी. कागदासारखी पातळ, चंद्रासारखी गोल, बुरशी व वास न येणारी आहे. चुलीवर भाजल्याने खरपूस असा वासही येतो. एकाही हॉटेलमधून ती खराब म्हणून परत येत नाही.

दिवसांतून 1800 भाकरी शिवापुरे रोज सात-आठ तास भाकरी थापण्याचे काम करतात. रोजच्या भाकरीची संख्या 750-800 आहे. मात्र एका दिवसांत 1800 भाकरी थापण्याचे काम केले आहे. कदाचित तो विक्रमही ठरू शकेल.
फोटो गॅलरी
Protestors worship batons to protes...


You need to upgrade your Adobe Flash Player to watch this video.

Get Adobe Flash player
WRESTLING DROPPED FROM 2020 OLYMPIC GAMES
 1:21
WRESTLING DROPPED
WRESTLING DROPPED FROM 2020 OLYMPIC GAMES
 1:03
WRESTLING DROPPED
The Challenges of an Indian Athlete
 1:02
The Challenges of
SUSHIL KUMAR EYEING RETURN TO ASIAN CHAMPIONSHIPS
 0:51
SUSHIL KUMAR EYEIN
प्रतिक्रिया
On 07/02/2013 03:10 AM Sunil Mungale said:
माउली, तुझ्या हातच्या भाकऱ्या खायला अमेरिकेहून सांगलीला नक्की यावे लागेल. धन्य तू अन्नपूर्णा! ह्या ४० आणि ६० कोटींच्या चोरट्यांना देव सदबुद्धी देवो.
On 07/02/2013 03:07 AM Priyamwadaveera Vasantgadkar said:
जिथे राबती हात तिथे हरी.
On 06/02/2013 10:05 PM Rajaram said:
सौ सुनिता यांना सलाम!
On 06/02/2013 09:58 PM puneri said:
सर्वात सुंदर हात,कष्ट करणारे,सुनिता ताईंचे काम कौतुकास्पद !
On 06/02/2013 09:49 PM yogesh said:
Manase paristhitivar mat karun kase chan jivan jagatat, kashach hi bau na karata.. afalatun ... hi aai roj 800 bhakari karate, tiche record 1800 in a day. can't belive .... sakal cha ha upakram फारच कौतुकास्पद aahe
On 06/02/2013 07:14 PM abc said:
ह्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यावे. सकाळ कडून हि माफक अपेक्षा...
On 06-02-2013 03:31 PM madhav said:
हि बातमी खरोखर चांगली आहे. जेवढे कलाकार, खेळाडू यांना महत्व दिले जाते तेवढंच महत्व अशा कष्टकरी लोकांना पण द्यावे. त्याची ब्राकिंग न्यूस व्हयला हवी.
On 06/02/2013 03:00 PM amit said:
एक छोटासा सल्ला देतो, कि सुनिता माउलीने अशेच कष्ट करून हॉटेल तसेच कंपन्यांना सुद्धा या भाकरी पुरवाव्यात.
On 06/02/2013 02:44 PM somnath mulay said:
आई तुम्ही देवापेक्षा पुंण्याचे काम करता आहे. मला तुमचा अभिमान आहे. मी पण अशाच मातेचा मुलगा आहे कि जी माज्या साठी रात्र रात्र राबते .मी तुम्हाला खात्री ने सांगतो कि गजानंद आणि अजित तुमचे नाव खूप मोठे करतील. माजा तुम्हाला आणि तुमच्या कामाला सलाम.
On 06/02/2013 02:44 PM kaustubh said:
खास्स!!!!!!!
On 06/02/2013 02:32 PM Ankur said:
सौ सुनिता यांचे कष्ट खरोखर कौतुकास्पद आहे..... तुम्हाला सलाम. दररोज ८०० भाकऱ्या. हा लेख वाचताना अंगावर कट आला. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा.
On 06/02/2013 01:50 PM shriniwas Bhimrao Sabale said:
आम्ही होस्टेल मध्ये असताना अशीच एक ताई होती फारच सुरेख भाकरी भाजायची खरपूस वास सर्व होस्टेल भर दरवळत राहायचं. भूख प्रज्वलित होवायाची मला तरी ते दिवस आठवले .सुनिता शिवापुरे ताई आपल्या प्रयत्नास यश येत राहो हीच माझी देवापुढे प्रार्थना. ...............श्रीनिवास साबळे
On 06/02/2013 12:57 PM PRAKASH PAWAR said:
त्या माउलीच्या इच्छा शक्तीला माझा सलाम..................
On 06/02/2013 12:51 PM manisha dangle said:
खरी सुगरण
On 06/02/2013 12:14 PM vaibhav kamble said:
डोळ्या मध्ये पाणी आले, काष्ठ्ची चीज होते च (माझ्या आई ने सुधा पापड लाटून मला शिकवले आहे )माझा तय्ना सदर प्रणाम
On 06/02/2013 10:57 AM sumit todkar said:
माझ्या डोळ्यात पाणी आले हे वाचून. गजानंद आणि अजित खूप अभ्यास करा आणि आईचे आणि बाबांचे नाव मोठे करा.
On 06/02/2013 10:56 AM Antu Barva said:
फारच चांगला आणि दुसर्यांना प्रेरणा देणारा लेख , सौ सुनिता यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, आणि सकाळ अशा लोकांच्या कामाला प्रसिद्धी देऊन तुम्ही खूप चांगले करीत आहेत.
On 06/02/2013 10:41 AM praful patil said:
सौ सुनिता यांचे कष्ट खरोखर कौतुकास्पद आहे..... hats ऑफ !!!
On 06/02/2013 10:28 AM Sagar S Potphode, Pune said:
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या कष्टांना कोटी कोटी प्रणाम. आपण आपल्या कष्टांनी सर्वांना जगण्याचा एक चांगला मार्ग दाखवला आहे. दुख करत न बसत आपण त्याचा सामना केला पहिजे याची प्रचीती सर्वाना दिलीत या बद्दल मी तुमचा आणि सकाळने हा लेख प्रसिद्धीस दिला त्याबद्दल त्यांचे आभार.
On 06-02-2013 08:57 AM sushama said:
ग्रेट, प्रयत्नांती यश
On 06/02/2013 08:33 AM avinash said: