जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे वाजले बारा
| |
- धोंडिराम पाटील - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 - 03:30 AM IST
| |
Tags: district security mandal, sangli
| |
सांगली - सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्थापना झालेल्या सांगली जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ कार्यालयाचा कारभार राम भरोसे आहे. स्थापना होऊन वर्ष झाले तरी स्वतंत्र कार्यालय, इमारत वा स्टाफ नाही. साहजिकच कामकाज कोठे आणि कसे सुरू आहे, हे कळत नाही. अधिकृतरीत्या नोंदणी करून सुरक्षारक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
खासगी एजन्सींकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करताना होणारी फसवणूक, लूट, अन्याय यावर उपाय म्हणून शासनाने सुरक्षा मंडळ स्थापन केले. त्याची विभागवार कार्यालये सुरू झाली. तीन जिल्ह्यांसाठी सांगली कार्यालय सुरू झाले. त्याचा कारभार मार्केट यार्ड व वेअर हाऊसमधील हमालांसाठी असलेल्या माथाडी मंडळातर्फे सुरू आहे.
400 लोकांची प्रतीक्षा यादी
कार्यालयातून सांगण्यात आले की, सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर अतिरिक्त कार्यभार पाहतात. ते अध्यक्ष आहेत. ते व माथाडी मंडळातील कर्मचाऱ्यांकडे वर्षभरापासून अतिरिक्त काम आहे. सांगली जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ, मार्केट यार्ड, सांगली असा पत्ता आहे. कार्यालय स्थापनेसाठीची अधिसूचना 21 फेब्रुवारी 2012 मध्ये जारी झाली. 18 मार्च 2013च्या आदेशानुसार श्री. पाटणकर यांनी अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. वर्ष सव्वावर्षात 15 संस्थांची नोंदणी झाली. 75 सुरक्षारक्षकांची अधिकृत नोंदणी झाली. ते ज्या ठिकाणी नियुक्ती आहेत, तिथेच त्यांना मान्यता दिली. असे सांगण्यात आले. 400 लोकांची प्रतीक्षा यादी तयार केली. त्यातील पात्रतेचे निकष व सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करणारे सर्वाधिक (99 टक्के) निवृत्त सैनिक आहेत. छाननीनंतर उरलेल्यांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात येते.
साधी, सोपी नोंदणी
केवळ 100 रुपये, छायाचित्र, वय (कमाल) (खुला वर्ग 35, मागासवर्गीयांना नियमानुसार शिथिलता) व शिक्षणाचा पुरावा (12 वी उत्तीर्ण), गुन्हा दाखल नसलेला, पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करून नोंदणी करता येते. नोंदणीकृत सुरक्षारक्षकांचीच भरती सर्व संबंधित आस्थापनांनी करावी, अशी अट आहे. अधिकृत नोंद असलेल्या सुरक्षा रक्षकाला नियमानुसार वेतन भत्ते या मंडळातर्फे (हमालांना माथाडी मंडळ देते तसा) मिळावेत अशी तरतूद आहे. मात्र. मंडळच पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने इच्छुकांची गैरसोय होत आहे.
तीन जिल्हे; एक निरीक्षक
मंडळाला मदत म्हणून एका तथाकथित कामगार युनियनच्या कार्यालयातून नोंदणी व परवाना पत्र देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे समजते. हजारावर लोकांची तशी नोंदणी झाल्याचे समजते. ती अधिकृत की अनधिकृत याबद्दल वाद आहे. तीन जिल्ह्यांसाठी तूर्त एका निरीक्षकाची नेमणूक झाली आहे. तीन जिल्ह्यांत मिळून कार्यरत सुरक्षारक्षक एजन्सी हजारात, तर सुरक्षारक्षकांची संख्या लाखात असावी; मात्र त्यांना मिळणारा मोबदला नियमानुसार तर नाहीच, त्यापेक्षा कितीतरी कमी आहे.
नोंदणीसाठी 15-20 हजार?
काहींनी सुरक्षारक्षक म्हणून नोंदणीसाठी प्रयत्न केला. त्यांना मध्यस्थांनी 15-20 हजार रुपये लागतील. नोंदणी करतो. परवान्याचे पत्रही लगेच देतो, असे सांगितले. मात्र, अधिकृतरीत्या असे शुल्क आकारले जात नाही, असे सुरक्षारक्षक मंडळातून सांगण्यात आले. मग मध्यस्थी करणारे हे कोण, असा सवाल उपस्थित झाल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा सुरक्षारक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment